Thane Bharti -ठाणे महानगरपालिका,राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात

 








ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२ येथे दि.०४/१२/२०२४ ते १७/१२ /२०२४ पर्यंत अर्ज सादर करावे.




ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात http://www.thanecity.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

१) वयोमर्यादा-

१. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि.१२/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादित असणे आवश्यक आहे.

२. मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई दि. २८ मे २०१९ रोजीच्या पत्रानुसार पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS), विशेषतज्ञ, अतिविशेषतज्ञ व अभियानातील इतर रूग्ण सेवेशी संबधित पदांसाठी (उदा. परिचारीका, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इ. सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील.

a. एमबीबीएस, विशेषज्ञ आणि अतिविशेषज्ञ, किमान वयोमर्यादा १८ वर्षे व कमाल वयोमर्यादा ६९ वर्ष राहील, वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुर्ननियुक्ती आदेश देण्यात येतील.

b. अभियानातील इतर रूग्ण सेवेशी संबंधित पदांसाठी (उदा. परिचारीका, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता इ. सेवा प्रवेश आणि सेवा समाप्तीची वयोमर्यादा किमान वयोमर्यादा १८ वर्षे व कमाल वयोमर्यादा ६४ वर्ष राहील, वय वर्ष ६० नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कडून शारिरीक दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतरच पुर्ननियुक्ती आदेश देण्यात येतील.

c. वर नमूद केलेली पदे वगळून इतर पदांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे अराखीव प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे व राखीव प्रवर्गाकरिता ४३ वर्षे राहील.

d. सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत उमेदवारास राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इतर पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास वयोमयदिचे बंधन नाही.

२) अर्ज भरण्या बाबतच्या सूचना-१

१. सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.

२. उमेदवाराने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी,

३. माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाण पत्रामध्ये नमूद जन्म तारीखच अर्जात नमूद करावी.

४. जाहिरात प्रसिध्द केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे वय (दिवस, महिने व वर्ष) अचूक नमूद करावे.

५. अर्जात उमेदवाराचे लिंग या बाबतची माहिती नमूद करावी.

६. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत जोडणे आवश्यक आहे.
७. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचूक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

८. गुगल फॉर्म परीपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी.

१. पुर्ण भरलेल्या गुगल फॉमची स्वसाक्षांकित प्रत व (ट) मधील मुद्दा क्र. ७ नुसार सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४००६०२ येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरीअरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालाने / कुरीयरने सादर करण्यात आलेले अर्ज विहीत कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी, उशीरा प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
१०. अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगलफॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.




३) शैक्षणिक अर्हता/पात्रता-

ठाणे महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे ११ महिने २९ दिवस कलावधीसाठी कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने एकत्रित मानधनावर भरणेकामी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागिवण्यात येत असून त्याकरीता पात्र व इच्छूक उमेदवारांकडून त्यांचे अर्ज विहित नमुन्यात ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प)-४००६०२ येथे दि.०४/१२/२०२४ ते १७/१२ /२०२४ पर्यंत अर्ज सादर करावे.

.क्र

पदनाम

पदसंख्या

शैक्षणिक पात्रता व अनुभव

वयमर्याद

प्रतिमहा मानधन

वैद्यकिय अधिकारी (Medical Officer

SC-, ST-,

VJA-,  NTC , NTD-, OBC-, SEBC-,

EWS-, OPEN-. एकूण २०

MBBS, Clinical experience in Govt. and/or | Private sector, And registration with MMC

किमान वयोमर्यादा १८ वर्ष कमाल  वयोमर्यादा ६९ वर्ष राहील

रुपये  ६०,०००/-

प्रयोगशाळा SC-. तंत्रज्ञ(लॅब तंत्रज्ञ)

एसटी-, व्हीजेए-

 

NTB-,

 

NTC-, NTD-,

 

ओबीसी-, एसईबीसी-.

 

EWS-.

 

ओपन-.

 

एकूण -१९

12वी + महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल नोंदणीसह डिप्लोमा

किमान वयोमयांदा १८ वर्षे कमाल वयोमर्यादा ६४ वर्ष राहील

रुपये १७,०००/-

शहर आरोग्य  व्यवस्थापक (Public Health Manager

SC -,

VJA-.

 

एकूण -

एमबीबीएस किंवा आरोग्यामध्ये पदवीधर (B.D.S./B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S./B.P.T h MPH/MHA/MBA आरोग्य सेवा प्रशासनात

किमान वयोमर्यादा १८वर्षे अराखीच प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे राखीव प्रवर्गाकरिता ४३ वर्ष

रुपये ३२,०००/-

प्रोग्राम असिस्टंट QA

 

OPEN- एकूण

इंग्रजीमध्ये 40 w.p.m आणि मराठीमध्ये 30 w.p.m टाइपिंगमध्ये GCC मधून उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेले कोणतेही पदवीधर

किमान वयोमर्यादा १८ वर्षे अराखीव प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे राखीव प्रवर्गाकरिता ४३ वर्ष

रुपये १८,०००/-




१. मा. आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांचे जा. क्र राआसोमं/मनुष्यबळ पदभरती/१०६७०-११०१६/२०२३ दि. २७/०४/२०२३ रोजीचे पत्राद्वारे प्राप्त सुचनांनुसार गुणांकन पद्धतीने पात्र उमेदवारांची करण्यात येईल.

२. गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येणार असून त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश Mail द्वारे टपालाद्वारे निर्गमित करण्यात येतील.

३. गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणान्या पदांकरिता कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही.



१२) सर्वसाधारण सुचना -

१. आवश्यक सुचना व माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत "संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.

२. कंत्राटी स्वरुपाचे असून ते राज्यशासनाचे नियमित पद नाही. या पदाचा राज्यशासनाच्या पदाशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्यशासनांच्या नियमित पदावर समायोजन करण्यांची मागणी करु शकणार नाही.

३. एकत्रित मानधन आहे.

४. दिल्यानंतर ७ दिवसांच्या आत मुळ कागदपत्रासह नियुक्तीचे ठिकाणी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. कागदपत्रांमध्ये व मुळ कागदपत्रांमध्ये पडताळणीच्या वेळीस तफावत आढळल्यास तसेच उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करणेत येईल, अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षा यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.

५. सोबत खालील कागदपत्रे १ ते १४ जोडण्यात यावीत. वैद्यकीय अधिकारी, या पदासाठी संकेत स्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज व त्या संबंधीची कागदपत्रे वरील अटी व शर्तीनुसार ठाणे महानगरपालिका, आरोग्य , चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) ४००६०२ (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) या पत्त्यावर दे. दि.१७/१२/२०२४ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं ४.०० वाजेपर्यंत सादर करावे. टपालाने, कुरीअरने अर्ज स्विकारले जातील.

१) पुर्ण माहिती भरलेला फॉर्मची प्रिंट

२) वयाचा पुरावा

३) पदवी/पदविका प्रमाणपत्र प्रमाणपत्र)

४) गुणपत्रिका

(As Applicable).

६)केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे

७) जात/वैधता प्रमाणपत्र

८) आवश्यकतेनुसार नॉन क्रिमीलेअर

९) अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)

१०) आधारकार्ड

११) पॅन कार्ड

१२) सध्याचा फोटो

(१३) प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र(Gazette)

१४) वाहन चालविण्याचा परवाना

१५) लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)

Demand Draft लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.

(१९) http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

जाहिरातीमधील पदसंख्या, आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानुसार यामध्ये वाढ/कमी करण्याचे अधिकार, तसेच विहित केलेला थेट मुलाखतीचा दिनांक व वेळ, ठिकाण इत्यादीमध्ये कोणत्याही टप्यावर,
कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार आयुक्त, ठाणे महानगरपालिका, ठाणे यांना राहतील. सदर जाहिरात ठाणे महानगरपालिका नोटीस बोर्ड आणि http://www.thanecity.gov.in भरती प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती सदरहू संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

गुगल फार्मचा अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफयात बंद करुन सादर करावे. केलेल्या महानगरपालिकेचे नाव, अर्जदाराचे नाव व पदाचे नाव नमूद करावे. नाव नमूद न केलेले अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.

सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकते नुसार बदल करण्याचे वा सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष, निवड समितीने राखून ठेवले आहेत.


























पुर्ण जाहिराती साठी खालील लिंक वर क्लिक करा 



लिंक उघडून खाली दिलेल्या चित्रात दाखविल्याप्रमाणे जुनी आणि नवीन दोन्ही जाहिरात पाहावी.





धन्यवाद 🙏.


Comments

Popular posts from this blog

समाज कल्याण भरती डिसेंबर-2024- शेवटचे काही दिवस शिल्लक

500 Assistant Vacancies at The New India Assurance Company Limited –Apply Now_ 500 जागांची भरती_The New India Assurance Company Limited

NABARD Bharti 2024_पगार 1.5 लाख ते 2 लाख रू.महिना