Pune ZP Jobs Dec-2024_पुणे जिल्हा परिषद भरती (बांधकाम विभाग उत्तर)
पुणे जिल्हा परिषद, पुणे (बांधकाम विभाग उत्तर)
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः
संकीर्ण- २७१५/प्र. क्र. १००/१३ दिनांक १७ डिसेंबर २०१६ नुसार बांधकाम विभाग उत्तर कडील कामकाजाच्या अंमलबजावणीसाठी ११ महिन्यांचे करार पध्दतीने सेवानिवृत्त शाखा अभियंता/ सहाय्यक अभियंता श्रेणी २, यांचेमधून कंत्राटी शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी २ अभियंत्यांची पदे भरावयाची आहेत. कंत्राटी पध्दतीने सेवानिवृत्त शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांचेमधून कनिष्ठ अभियंत्यांच्या सेवा घेण्यासाठी पद संख्या व अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत.
पात्रता निकष -
पदाचे नांव- सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी - २
भरावयाची पदे :०३
पदवीधर / पदविकाधारक शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २, गट-ब रापत्रित / अराजपत्रीत असणे आवश्यक.
वयोमर्यादा :वय वर्षे ६५ पेक्षा अधिक नसावे.
वेतन-
अ) महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २७१५/प्र. क्र. १००/१३ दिनांक १७ डिसेंबर २०१६ मध्ये नमूद करणेत आलेप्रमाणे नियुक्तीच्या वेळी महागाई भत्यासह मिळत असलेल्या निवृत्ती वेतनाएवढी रक्कम (अंशराशीकृत निवृत्तीवेतन वगळून) त्यांचे मासिक परिश्रमिक म्हणून देय राहील. ब) ज्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा निवृत्तीवेतनार्ह नाहीत त्यांना करारपध्दतीने नियुक्त करताना, सेवानिवृत्तीपूर्वी मिळत असलेल्या वेतनाच्या आधारे त्यांची मानीव निवृत्तीवेतनाची रक्कम आणि त्यावर प्रचलित दराने महागाई भत्याची रक्कम केवळ हिशेबासाठी परिगणित करुन त्या आधारे त्यांचे मासिक पारिश्रमिक रक्कम निश्चित करण्यात येईल. . अर्ज करण्याची पद्धत-सोबत अर्जाचा नमुना जोडला आहे.
१) उमेदवारने जाड फुलस्केप कागदावर स्वतःचे नांव (आडनांव प्रथम), जन्म दिनांक, वय, लिंग, पत्रव्यवहाराचा तपशिल माहितीसह अर्ज सादर करावा. अर्जाच्या वरील डाव्या बाजूस अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटविणेत यावा. व आपले स्वाक्षरीने साक्षांकित करणेत यावा.
२) अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे साक्षांकित करुन जोडावीत (अ) सेवानिवृत्त आदेशाची व कार्यमुक्त आदेशाची प्रत (ब) सेवानिवृत्ती वेतन मंजूर पी.पी.ओ.ची प्रत (क) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र (ड) संगणक अर्हता (MSCIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र.
३) कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांची नियुक्ती ११ महिन्याच्या कालावधीसाठी करार तत्त्वावर करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशानाचे / सामावून घेण्याचे वा नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकारी / हक्क नसेल.
४) नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा अधिकाऱ्यांच्या करार पध्दतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकारी राहतील.
५) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामाती व्यत्यय निर्माण होईल, अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी.
६) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील.
७) करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्र / माहिती व आधार सामुग्रीबाबत गोपनियता पाळणे आवश्यक राहील.
८) करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर सोपविलेले कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण
करणे आवश्यक राहील. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेले प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील.
९)करारपध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय व वित्तीय अधिकारी प्रदान करता येणार नाहीत.
१०) उमेदवाराने जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक असल्याचे खात्री करुनच अर्ज करणे आवश्यक राहील. अर्जात चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असल्यास व उमेदवार योग्य पात्रताधारक नसल्याचे आढळून आल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल.
११) सदरचे पद कंत्राटी (करार) पध्दतीने भरावयाचे असल्याने शासकीय सेवकांच्या सेवा सवलती व आर्थिक लाभ याचा
फायदा मिळणार नाही. तसेच कोणतेही कायदेशीर हक्क राहणार नाहीत.
१२) नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास अथवा नोकरी सोडावयाची असल्यास तीन महिना अगोदर लेखी पूर्वसूचना द्यावी किंवा रोख स्वरुपात दोन महिन्याचे एकत्रित वेतन शासनाच्या खाती भरणे बंधनकारक राहील.
१३) आपली कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर निवड झालेनंतर आपले विरुध्द कोणत्याही प्रकारची पोलीस केस अथवा न्यायालयीन केस प्रलंबित नसलेचा चारित्र्य पडताळणी दाखला आपले नजिकचे पोलिस स्टेशनवरुन आणून देणे बंधनकारक असेल.
१४) खाते निहाय चौकशी सुरु नसलेचा व कोर्ट केस नसलेचा दाखला सादर करणे आवश्यक राहील.
१५) श्रेत्रीय स्तरावर करार पध्दतीने नेमणूक दिलेल्या कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवाकालामध्ये काही नैसर्गिक अपघात व काही आजार उद्भवल्यास कार्यालय/शासन कोणत्याही प्रकारची भरपाई देणार नाही व बांधील राहणार नाही.
१६) करार पध्दतीने नियुक्त केलेल्या कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांनी नियुक्ती आदेश मिळाले पासून पंधरा दिवसांचे आत रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा सदर नियुक्ती आपोआप रद्द अथवा समाप्त होईल व तात्काळ पुढील पात्र उमेदवारांस नियुक्ती आदेश देण्यात येतील.शासननिर्णय/नियमांस अधिन राहून अदा करणेत येतील.
१८) करारनामा कालावधीमध्ये नियुक्तीचे ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक राहील.
१७) कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवा काळामध्ये अनुज्ञेय मानधन व इतर भत्ते
१९) कंत्राटी शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांचेवर शासनकडील आवश्यक ते निर्णय / नियम व वेळोवळी निर्गमित होणारे शासन निर्णय बंधनकारक राहतील.
२०) अर्ज दिनांक ११/१२/२०२४ पर्यंत बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे येथे पोहोचतील असे पहावे. त्यानंतर आलेल्या विचार केला जाणार नाही.
विहित नमुन्यातील अर्ज खाली जोडलेला आहे.
ऑफिशियल जाहिरात खलिल लिंक वर जाऊन पहावी .
https://www.zppune.org/pgeAdvertise.aspx
खालील फोटोत लाल रंगात दर्शवलेली लिंक पहावी.
धन्यवाद !!! 🙏
Comments
Post a Comment