NHM- राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत भरती -Naukariveda careers _nhmbharti_sarkaribharti_jobs_maharashtra_government
![]() |
आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत उपसंचालक कार्यालय लातूर मंडळ लातूर करीता रिक्त असलेल्या पदाची पदभरती प्रक्रियेसाठी खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे निव्वळ कंत्राटी स्वरुपात व करार पध्दतीने मानधन तत्वावर करावयाची आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज "उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर ४१३५१२ येथे दि.०६/१२/२०२४ ते दि.२०/१२/२०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत.
संस्थेचे नांव : राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालक आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर कार्यालय
पदाचे नांव :
प्रकल्प समन्वयक (Project Co- ordinator) at DD Level (आयुष्मान भारत डिजीटल मिशन अंतर्गत)
पदसंख्या व प्रवर्ग :
01 (अराखीव) आरक्षण लागू नाही
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
BE/B-Tech किंवा BCA/MCA किंवा MBA/Post Graduate Diploma in Management किंवा मास्टर्स इन पब्लिक हेल्थ मान्यताप्राप्त संस्थेतून
प्राधान्याने अनुभव :
1) 5+ वर्षांचा कामाचा अनुभव.
2) आरोग्य सेक्टरमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल
3) एमएस ऑफिस आणि HMIS संबंधित कामाचा अनुभव.
वयोमर्यादा:
कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे (राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल
एकत्रित मानधन:Rs.50,000/-
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचना.
1) पदाचे नाव:- प्रकल्प समन्वयक/ Project coordinator
सूचक शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अनुभव:
बीई/बी-टेक, किंवा बीसीए/एमसीए किंवा
एमबीए / पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट किंवा
मान्यताप्राप्त संस्थेतून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी.
2) आरोग्य सेवा क्षेत्रात 5+ वर्षांचा कामाचा अनुभव
3) एमएस ऑफिस आणि एचएमआयएस संबंधित कामाचा अनुभव.
4) आरोग्य क्षेत्रातील सूचक भूमिका आणि जबाबदाऱ्यांमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
5) प्रकल्प दस्तऐवजीकरण, जसे की योजना आणि अहवाल.
6) प्रोजेक्ट डिलिव्हरेबल्सचे निरीक्षण आणि मूल्यमापन.
7) नातेसंबंध व्यवस्थापन.
8) अडथळ्यांचे व्यवस्थापन करणे आणि व्यवस्थापनाकडे ते वाढवणे.
9) हँडहोल्डिंग भागधारक.
#naukari #nhmbharti #latur #career #jobs #maharashtragovernmentjobs
उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर या कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपरोक्त तक्त्यामध्ये नमुद रिक्त असणाऱ्या पदासाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर रिक्त पदासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि.०६/१२/२०२४ पासुन ते दि.१०/१२/२०२४ रोजी पर्यंत सकाळी १०.०० वाजेपासुन ते सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दि५०/१२/२०२४ रोजी नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. तसेच ई-मेलव्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :
राष्ट्रीय आरोग्य अभियान विभाग "आरोग्य संकुल, तिसरा मजला उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, लातूर, बार्शी रोड, नविन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर ४१३५१२"
अटी व शर्ती :-
१) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.१५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.१००/- रुपयांचा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे. सदरील धनाकर्ष (Demand Draft) Deputy Director of Health Services, Latur या नावाने काढावा. धनाकर्ष (Demand Draft) राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. ऑनलाईन पध्दतीने या कार्यालयास पाठविण्यात आलेला धनाकर्ष ग्राहय धरण्यात येणार नाही. धनाकर्ष हा ऑफलाईन पध्दतीनेच अर्जासोबत जोडून सादर करण्यात यावा.
२) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच दि. २०/१२/२०२४ रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे.
३) सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दि.०६/०३/२०२४ रोजीच्या शासणनिर्णयानुसार एकाकी पदास आरक्षण लागू नाही त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील दि. २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयातील तरतुदीनुसार अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय १८ वर्ष व कमाल वय खुला प्रवर्गासाठी ३८ वर्ष व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील व मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियानसं चालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.२९/०९/२०१८ रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सेवेतील कार्यरत उमेदवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा ५ वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
४) अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाहनोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette) अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे.
५) अर्जामध्ये उमेदवाराने स्वतःचा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालु भ्रमणध्वनीचा क्रमांक नमुद करणे बंधनकारक आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात देण्यात येणाऱ्या सुचना ई-मेल व्दारे देण्यात येतील. पात्र उमेदवारांची यादी उपरोक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर ई-मेल आयडी पदभरती प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत चालु राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जवाबदारी उमेदवारांची राहील.
६) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवास आहे किंवा कसे हे नमूद करणे आवश्यक आहे, असल्यास त्याबाबतचे विहीत प्रमाणपत्र (Domicile Certificate) अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
७) अर्ज भरत असताना अंतिम वर्षाला मिळालेले गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुण व गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रात नमूद गुण व गुणांची टक्केवारी अर्जात नमुद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजूर करण्यात येतील.
८) शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा आरोग्य विभागाशी संबधित शासकिय /निमशासकिय अनुभव धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापुर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये. त्याअनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
९) वरील नमूद पद हे राज्य शासनाचे पद नसून, निव्वळ कंत्राटी स्वरुपाचे पद आहे. सदर पदावर शासकिय सेवेप्रमाणे असलेले नियम, अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागु नाहीत.
१०) केंद्र/राज्य शासनाने संबधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
११) पदासाठी उमेदवारांनी सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे, तसेच पदवीचे सर्व गुणपत्रक (पहिले वर्ष ते अंतिम वर्ष) पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून (१० वी व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला) ही सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित / स्वसांक्षाकिंत) जोडावीत नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईजड अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील.
१२) उपरोक्त नमूद केलेले पद हे मा. आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राआअ मुंबई यांचे पत्र जा.क्र. राआसो/मनुष्यबळ/पुनर्नियुक्ती मार्गदर्शक सुचना /१२५०४१-४४३/ २०२२ दि.२५.१०.२०२२ रोजीच्या पत्रान्वये रुजू दिनांकापासून दि.२९/०६/२०२५ पर्यंतच्या कालावधी करीता राहील. सदरील कालावधीमध्ये काम समाधानकारक असल्यास एक दिवसाचा तांत्रिक खंड देवून पुढील कार्यकाळासाठी पुनर्नियुक्ती आदेश सक्षम अधिकाऱ्याकडून दिले जातील. १३) अर्जदार हा संबधित पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
१४) अर्ज सादर करणेकामी व मुलाखतीकरीता उपस्थित उमेद्वाराना प्रवासभत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही.
१५) सदर रिक्त पदांच्या संख्येत, तसेच पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकारी मा. उपसंचालक, आरोग्यसेवा, लातूर परिमंडळ, लातूर यांनी राखुन ठेवलेले आहेत.
१६) अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
१७) अर्जाचा नमुना हा (www.nrhm.maharashtra.gov.in, www.arogya.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही
१८) महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम २००५ नुसार अर्जासोबत जोडावयाचे लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
१९) अर्जासोबत दिलेल्या माहितीच्या आधारे उमेदवाराची पात्रता तपासण्यात येईल व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल. तथापि अर्ज स्विकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवार त्या पदाकरीता पात्र आहे असा होणार नाही. निवड प्रक्रियेत दरम्यान कोणत्याही वेळी किंवा निवड नंतर अर्ज विहीत अर्हता धारण करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांची निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
२०) पदभरती बाबत पात्र अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी आणि पदभरती बाबतच्या आवश्यक सुचना व सुधारणा वेळोवेळी आरोग्य विभागाच्या संकेत स्थळावर www.nrhm.maharashtra.gov.in
प्रकाशित करण्यात येतील. या करीता वेळोवेळी संकेतस्थळी भेट देणे.देखील बंधनकारक आहे. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही. २१) अनुभवाचा तपशिल नमूद करताना पहिली नियुक्ती कालावधी ते सध्याची नियुक्ती कालावधी या क्रमानेच दयावी.
२२) अनुभवाचा तपशील नमूद करीत असताना ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच कार्यालयाचा तपशील फार्म मध्ये नमूद करावा, अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा.
२३) ज्या पदाकरीता अर्ज केला आहे त्या पदाकरीता आवश्यक असलेला अनुभवच ग्राहय धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
२४) सदर पदभरतीच्या प्रक्रियेचे सर्व अधिकार मा. उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांनी राखून ठेवले आहेत.
२५) उपरोक्त पदाकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाची छानणी करुन पात्र ठरणाऱ्या उमेदवाराकरीताच राबविण्यात येईल. पात्र/अपात्र उमेदवारांची यादी, अंतिम निवड यादी संकेतस्थळावर करण्यात येईल.
२६) सदर पदाची निवड ही खालील तक्त्यामध्ये नमुद तक्त्याप्रमाणे मा. उपसंचालक, आरोग्य सेवा लातूर परिमंडळ लातूर यांच्या मान्यतेने निकष लावून निवड गुणानुक्रमे खालील निकषानुसार करण्यात येईल.
२७) सदरील गुणानुक्रमानुसार निवड करताना उमेदवारांचे एकाकी पद असल्यामुळे गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येईल.
२८) गुणांकन यादी तयार केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवारांचे वय जास्त आहे अशा उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल. तसेच उमेदवारांचे गुणांकन (Merit) व वय देखील समान असेल तर अशा वेळी उमेदवाराचा आरोग्य विभागाशी निगडीत अनुभव जास्त असलेल्या अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
२९) जाहिरातीत नमूद केलेले पदाचे वेतन हे एकत्रित मानधन आहे.
३०) निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी व शर्ती मान्य असल्याबाबत रु.१००/- बॉन्ड पेपरवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल.
३१) निवड झालेल्या उमेदवारांना उपसंचालक आरोग्य सेवा लातूर मंडळ लातूर येथे रिक्त असलेल्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल, याची नोंद घ्यावी. नियुक्ती आदेश दिल्यानंतर ०७ दिवसांच्या आत नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील. (उमेदवारांने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल, अन्यथा त्याची नियुक्ती आदेश संपुष्ठात आणून प्रतीक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.)
अर्ज नमुना खालील प्रमाणे :
Comments
Post a Comment