Jobs at Pimpri Chinchwad Municipal corporation jobs_पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती
टिप - उमेदवारांच्या उपलब्धतेनुसार कामाचा अनुभव व आरक्षणाची अट शिथिल करणेत येईल.
अर्ज स्विकारणे विषयक माहिती
walk in interview साठी उपस्थिती व अर्ज स्विकारण्याचे ठिकाण:
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पदव्युत्तर संस्था,
दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, संत तुकारामनगर पिंपरी-१८
Walk in interview साठी उपस्थीतीची वेळ, दिनांक :
१२/१२/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत तसेच उमेदवार उपलब्ध न झालेस तेथुन पुढे दर सोमवारी walk in interview द्वारे सकाळी १०.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत राहिल.
अटी-शर्ती
१) सदर जाहिरातीद्वारे विहीत मुल्यांकन पध्दतीने प्रारुप गुणवत्ता यादी तयार करुन आवश्यकतेप्रमाणे म्हणजेच महापालिकेला गरज भासेल त्याप्रमाणे गुणवत्ता यादीमधुन मानधन द्वारे आवश्यक संख्येने पदांच्या नियुक्त्या करणेत येतील.
२) जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पदाकरिता कामकाज कालावधी ११ महिने राहिल.
३) सदरची नेमणुक तात्पुरत्या स्वरुपातील असल्याने उमेदवारांची निवड स्थानिक परिस्थिती व गरजेनुसार करण्यात येणार आहे.
४) वय वर्ष ५७ वर्षे पुर्ण असणा-या उमेदवारांनी उपरोक्त नमुद पदासाठी अर्ज करु नयेत असे अर्ज अपात्र समजणेत येतील.
५) विहीत शैक्षणिक पात्रता व अनुभव आवश्यक राहील.
६) सदर पदाच्या कंत्राटी नेमणुका पुर्व नियोजित तारखेस walk in interview द्वारे करण्यात येतील.
७) उमेदवारांची पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रासह एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मुळ कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीचा एक संच घेवुन मुलाखतीस हजर रहाणे आवश्यक आहे. सदर अर्ज नमुना व मुल्यांकन पध्दत नमुना मनपा वेबसाईटवर उपलब्ध आहे.
८) उमेदवारांच्या जन्म तारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची सांक्षाकिंत प्रत अथव जन्मतारखेची नोंद असलेली शालांत परिक्षेच्या उत्तीर्ण सर्टिफिकेटची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
९) उमेदवार मागसवर्गीय असलेल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करुन कोणकोणत्या प्रवर्गात मोडत आहे, याचा उल्लेख करावा.
१०) अर्जदार महिला असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. (शासनमान्य)
११) विहित पात्रता धारण न करणा-या उमेदवारांचे अर्ज व पुर्ण किंवा चुकीचे भरलेले अर्ज, वय, शैक्षणिक अर्हता, गुणपत्रक, जातीचा दाखला, अनुभव इत्यादी संदर्भातील आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांकित सत्यप्रती न जोडलेले अर्ज अपात्र समजण्यात येतील.
१२) मुलाखतीसाठी येणा-या उमेदवारांना स्वचनि मुलाखतीसाठी उपस्थीत रहावे लागेल.
१३) वरिल पदे ही संपुर्णपणे कंत्राटी स्वरुपाची असल्याने या पदावर कायम स्वरुपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.
१४) वरिल पदासाठी कामाचे स्वरुप ठरविण्याचे सर्वस्वी अधिकार पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय प्रमुखांना राहतील.
१५) सदर पदांना नमुद केलेनुसार रुग्णालयाच्या सोईनुसार सेवा देणे बंधनकारक असेल तथापी पदांची कामकाजाची वेळ निश्चित करण्याचे अधिकार पदव्युत्तर संस्था, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय विभाग प्रमुख तसेच रुग्णालय प्रमुख यांचे असतील,
१६) अपात्र ठरविलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. बोलविलेल्या उमेदवारांस नियुक्ती देण्याबाबतचे सर्व अधिकार मा. महापालिका आयुक्त यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत या बाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही.
१७) महापालिकेच्या अस्थापनेवरील नियमीत कर्मचा-याच्या लाभदायी योजना मानधन तज्ञ वैदयकीय अधिकारी (कन्सल्टंट) यांना लागु होणार नाही.
१८) निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर, अर्जदार अर्हता धारण न करणारा आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, सेवा देण्यास टाळाटाळ केल्यास, रुग्णालयाची वेळ न पाळल्यास व दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास कामकाज/नियुक्ती आदेश रद्द करणेत येईल.
१९) रुग्णालयीन वेळेनुसार बम्ब इम्प्रेशन करणे बंधनकारक राहील. रुग्णालयीन वेळेत थम्ब मध्ये उशीर झाल्यास मनपा नियमानुसार नियमाधिन कारवाई करणेत येईल. तसेच रुग्णालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने तातडीच्या परिस्थितीत रुग्णालयात उपस्थीत रहावे लागेल.
२०) मानधनावरील नियुक्त केलेल्या पदाचे काम सोडताना किमान एक महिना अगोदर लेखी पुर्व सुचना कार्यालयास देणे बंधनकारक राहिल अन्यथा एक महिन्याचे मानधन मनपा कोषागारात जमा करणे बंधनकारक राहिल. राजीनामा सादर न करता परस्पर काम सोडून गेल्यास मानधन कपात करण्यात येईल.
२१) नियुक्ती संदर्भात अंतिम अधिकार मा.आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी १८. यांना राहतील आणि निवड/नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर, कोणतेही कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार त्यांनी राखून ठेवले आहेत.
२२) सदर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असुन सदरहू भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहिती नमुद संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.



Comments
Post a Comment